योंगमूडो स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप 2026 मध्ये खेळाडूंची दमदार कामगिरी

२०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; ५० सुवर्ण, ७० रौप्य, ७० कांस्य पदकांसह ७० चौथे क्रमांक

पुणे : योंगमूडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या आयोजनाखाली योंगमूडो स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप 2026 ही राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून २०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ५० सुवर्णपदके, ७० रौप्यपदके आणि ७० कांस्यपदके पटकावली. तसेच ७० खेळाडूंनी चौथा क्रमांक मिळवत अंतिम फेरीपर्यंतची आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध वयोगट आणि वजनगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.

स्पर्धेत पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, मुळशी, मावळ, बीड, लवणवाडा यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्याचबरोबर A.R.M.A. Martial Arts, Dragon Martial Arts, Bright Futures Sports Academy, Universal Power Martial Arts, Rishi Martial Arts, All Martial Arts यांसह विविध मार्शल आर्ट्स संघ आणि अकॅडमींच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होत आपले कौशल्य दाखवले.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी आत्मविश्वास, शिस्त, शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, संयम आणि क्रीडे भवती आपली भावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील योंगमूडो आणि मार्शल आर्ट्स क्षेत्रातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले.

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी आणि पालक एकत्र आले. त्यामुळे राज्यातील मार्शल आर्ट्स क्षेत्रातील एकता, संघभावना आणि क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळाले.

पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योंगमूडो फेडरेशन ऑफ इंडिया तसेच योंगमूडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि योंगमूडो असोसिएशन ऑफ पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यामध्ये योंगमूडो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अविनाश धोत्रे, योंगमूडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नामदेव धोत्रे, कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष गणेश कदम, उपाध्यक्ष राजू गोसावी, सचिव सचिन देशमुख, तसेच सहसचिव कैलास वेताळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

तसेच योंगमूडो असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष मनोज भंडारी, सचिव अमर मोरे आणि खजिनदार महेश गुरव यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

“One Team. One Spirit. One Goal. Yongmoodo.”

“One Team. One Spirit. One Goal. Yongmoodo.” या ब्रीदवाक्याने पार पडलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, प्रशिक्षक, पंच, स्वयंसेवक, पालक, खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हे खेळाडू निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Bhagwe Swarajya News Desk

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Publised

  • All Posts
  • आरोग्य
  • क्राइम
  • खेळ
  • ठाणे
  • देश
  • देश विदेश
  • नवी मुंबई
  • पालघर
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • राजकीय
  • वायरल
  • विचारमंच
  • विडियो
  • शिक्षा
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा
Bhagwe Swarajya

सत्य, निष्पक्ष आणि स्वाभिमानी विचारांचा बुलंद आवाज – साप्ताहिक ‘भगवे स्वराज्य’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्य विचारांची प्रेरणा घेऊन सुरू झालेले ‘भगवे स्वराज्य’ हे महाराष्ट्रातील जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा निर्भीड आवाज आहे.

Site Links

Follow Us

© 2026. Bhagweswarajyanews.in | All Rights Reserved