Editor's Desk

सन्माननीय वाचक आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय शिवराय!

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’ हे केवळ एका राज्याची सीमा नव्हती; तर तो विचार होता सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा, न्यायव्यवस्थेचा आणि स्वाभिमानाचा. आजच्या काळात पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जात असली, तरी वाढते व्यापारीकरण आणि सत्तेच्या दबावामुळे अनेकदा सामान्य माणसाचा आवाज मागे पडताना दिसतो. याच पार्श्वभूमीवर समाजाला निष्पक्ष, धाडसी आणि स्वाभिमानी विचारमंच मिळावा या संकल्पातून ‘भगवे स्वराज्य’ या मराठी साप्ताहिका चा प्रवास सुरू झाला.
आमचा लढा कोणत्याही व्यक्ती, जात किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यापासून ते तरूणांच्या रोजगाराच्या संधींना दिशा देण्यापर्यंत; आणि महाराष्ट्राच्या दैद्वीपमान ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यापासून ते ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यापर्यंत आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
माहितीच्या विस्फोटाच्या या युगात ‘सत्य’ आणि ‘अफवा’ यातील फरक ओळखणे आव्हानात्मक बनले आहे. अशा वेळी डिजिटल आणि मुद्रित दोन्ही माध्यमांतून केवळ तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि संशोधनाधारित विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.
‘भगवे स्वराज्य’ हे केवळ एक साप्ताहिक नसून, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी एक चळवळ आहे. वाचक म्हणून आपण आमच्या पाठीशी उभे राहाल आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन, समर्थन व विश्लेषणात्मक सूचना देत राहाल, हीच नम्र अपेक्षा.

आपला नम्र,
प्रकाश संपत आरगडे
मुख्य संपादक,
भगवे स्वराज्य (साप्ताहिक)

Bhagwe Swarajya

सत्य, निष्पक्ष आणि स्वाभिमानी विचारांचा बुलंद आवाज – साप्ताहिक ‘भगवे स्वराज्य’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्य विचारांची प्रेरणा घेऊन सुरू झालेले ‘भगवे स्वराज्य’ हे महाराष्ट्रातील जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा निर्भीड आवाज आहे.

Site Links

Follow Us

© 2026. Bhagweswarajyanews.in | All Rights Reserved